Ahmednagar news: तिहेरी हत्याकांड प्रकरणात उपचार घेत असलेल्या एकाचा काल उपचारादरम्यान मृत्यू.
राहता: शिर्डी नजीक असलेल्या सावळीविहीर गावात बुधवारी झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात शुक्रवारी उपचार घेत असलेल्या चांगदेव गायकवाड (वय 55) यांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या हत्त्याकांडातील मृत्तांचा आकडा चार झाला असून दोन जखमींवर उपचार सुरु आहेत.
गुरुवारी रात्री संगमनेर येथील सुरेश निकम व त्याचा चुलत भाऊ रोशन निकम या दोघांनी सावळीविहीर येथे सासुरवाडीला येऊन गायकवाड कुटुंबियातील 6 सदस्यांवर धारदार शास्त्राने हल्ला केला होता.
या हल्ल्यात आरोपीची पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित व आजी सासू हिराबाई गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला तर आरोपीचे सासरे चांगदेव गायकवाड सासू संगीता गायकवाड व मेव्हुणी योगिता जाधव यांच्यावर साईनाथ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान चांगदेव गायकवाड यांची प्राणज्योत मावळली. या हल्ल्यात जखमी असलेल्या संगीता गायकवाड व योगिता जाधव यांच्यावर सध्या साईनाथ हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.
Web Title: Another killed in Shirdi massacre, six people were attacked
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App