Home अहमदनगर नगर अर्बन बँक घोटाळयाप्रकरणी आणखी एकास अटक

नगर अर्बन बँक घोटाळयाप्रकरणी आणखी एकास अटक

Breaking News | Nagar Urban Bank Scam:  अर्बन बँकेमधून दोन कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र त्यातून दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडले.

Another person arrested in connection with Nagar Urban Bank scam

नगर : नगर अर्बन बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी थकीत कर्जदार अविनाश प्रभाकर बैकर (रा. अटक केली. त्याने दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडण्यासाठी मेसर्स ए. व्ही. इंजिनीअरिंग वर्क्स या कंपनीच्या नावे अर्बन बँकेचे कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

वैकर याने स्वतःच्या कंपनीकरिता खेळते भांडवल म्हणून अर्बन बँकेमधून दोन कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र त्यातून दुसऱ्या बँकेचे कर्ज फेडले. दुसऱ्या बँकेत स्वतःच्या नावावर गुंतवणूकही केली. उर्वरित रकमेतून अन्य व्यवहार केले, असे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने त्याला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अॅड. अर्बन बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सरुवातीला शाखाधिकारी मुकेश जगन्नाथ कोरडे, प्रदीप जगन्नाथ पाटील यांना अटक झाली. नंतर माजी संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदूलाल कोठारी, माजी अशोक कटारिया यांनाही आणि त्याहीनंतर सीए व माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी, मनोज फिरोदिया, प्रवीण लहारे यांना अटक झाली. आता कर्जदार अमोल वैकर याला अटक केली.

Web Title: Another person arrested in connection with Nagar Urban Bank scam

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here