अकोलेतील आणखी एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू, आरोग्य प्रशासन सतर्क
Breaking News | Akole: स्वाइन फ्लूने तालुक्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला.
अकोलेः अकोले तालुक्यातील गणोरे येथे स्वाइन फ्लूच्या आजाराने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. पाडाळणे येथील एका रुग्णाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे स्वाइन फ्लूने तालुक्यात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. राजूर येथील एका स्वाइन फ्लू रुग्णावर सध्या संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तालुक्यामध्ये डेंग्यूचे ७, चिकुनगुनिया २ तर काही स्वाइन फ्लू सदृश रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सलग चार-पाच दिवस जोरदार पाऊस कोसळत असल्याने तालुक्यात सर्दी, खोकला, हिवताप रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. स्वाइन फ्लू, डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.
शहरातील रायगडनगर, शिवाजीनगर, महालक्ष्मी कॉलनी, शेकईवाडी, पेठ परिसरात थंडी, तापाचे रुग्ण मोठ्या संख्येत निदर्शनास आले आहेत. गावोगावी आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत उघड्या पाण्याच्या टाक्या, जुने टायर, नारळ कवट्या याकडे लक्ष द्यावे. नागरिकांनी आठवड्यातून एक दोनदा कोरडा दिन पाळावा. नगरपंचायत आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. – बाळासाहेब वडजे, नगराध्यक्ष अकोले.
तालुक्यात स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे घराजवळ स्वच्छता ठेवावी. पाण्याने भरलेले डबके साठू देऊ नये. पाणी साठविलेल्या भांड्यांवर झाकणे ठेवावे. डासांची अंडी व अळ्या तयार होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. आजार अंगावर काढू नये ताटकळत उपचार घ्यावे. – डॉ. श्यामकांत शेटे, तालुका आरोग्याधिकारी. सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. नगरपंचायत व ग्रामपंचायत कडे मच्छर निर्मूलन मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येत आहे.
Web Title: Another person died of swine flu in Akole
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study