Home Crime News पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगून आलेल्याने आणखी एका महिलेची केली हत्या

पत्नीच्या हत्येची शिक्षा भोगून आलेल्याने आणखी एका महिलेची केली हत्या

Junnar Crime

Junnar Crime : आपल्या पत्नीची हत्या करून शिक्षा भोगून बाहेर आलेल्या एका इसमाने अनैतिक संबंधातून आणखी एका महिलेची हत्या केल्याची खळबळजनक घटना जुन्नर तालुक्यातील रानमळा येथे उघडकीस आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आळेफाटा पोलिसांना अवघ्या एका तासात करता आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाली असल्याचे पोलीस तपासातुन समोर आले आहे.

संतोष बबन मधे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून मृत महिलेचे नाव सगुना गोरख केदार (वय ४०) असे आहे. आरोपी संतोष मधे आणि सगुना केदार हे दोघेही अनैतिक संबंधातून जुन्नर तालुक्यातील रानमळा येथे राहत होते. दरम्यान संतोष हा सगुणाला वारंवार दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करून तिचा छळ करत होता. यानंतर सगुणा रानमळा परिसरातील एका शेताच्या कडेला वेगळी राहायला लागली होती. संतोषला या गोष्टीचा राग आल्याने बुधवारी पहाटेच्या दरम्यान त्याने सगुनाच्या डोक्यात तसेच तोंडावर धारदार शस्त्राने वार करुन तिची हत्या केली. अशी फिर्याद मयत सगुनाचे वडील भाऊसाहेब रखमा दुधवडे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवून दिला. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा तपास सुरू केला. यानंतर संतोषला बेल्हे परीसरातुन तासाभरात अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Web Title : Another woman murdered after being convicted of murdering his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here