गाय गोठा फाईल मंजूर करून देणाऱ्या खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या
Breaking News | Bribe Case: चार हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी व्यक्तीला अटक.
छत्रपती संभाजीनगर :– छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पंचायत समिती मधील BDO याच्याकडून गाय गोठा फाईल मंजूर करून देतो. चार हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहे.
तक्रारदार, यांनी शासकीय योजनेतून गाय गोठा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. (खाजगी व्यक्ती) शिवाजी रतन पखे (48 वर्ष) यांनी तक्रारदार यांना पंचायत समिती मधील BDO यांच्याकडून गायगोठ्याची फाईल मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच मागितली होती. 5000 पैकी चार हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. तसेच चिखलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव ,अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर ,पर्यवेक्षण अधिकारी तळेकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. छ. संभाजी नगर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.छ. संभाजीनगर,सापळा पथक – पोलीस हवालदार नागरगोजे, काळे, पैठणकर, पोलीस अंमलदार साठे ला. प्र. वि. छ. संभाजीनगर, या पथकाने लाचखोर खाजगी व्यक्तीला अटक केली आहे.
Web Title: anti-corruption department shackled the private person who approved the cow gotha file
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study