Home अकोले शेंडी येथे विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट चार बाधित  

शेंडी येथे विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट चार बाधित  

Antigen test four interrupted at Shendi

अकोले | Shendi: शेंडी भंडारदरा परिसरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली असून यात यात चार जण कोव्हीड बाधित आढळून आले आहे. त्यांना कोव्हीड केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केल्यामुळे आता रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांच्या संखेत नियंत्रण मिळाले अशी माहिती शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे यांनी दिली.

राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, नरेंद्र साबळे, सरपंच दिलीप भांगरे यांनी विनाकारण फिरणाऱ्यांची शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून ५७ जणांची जागेवर कोव्हीड चाचणी करण्यात आली. यामध्ये चार जण बाधित आढळून आले. त्यांची कोव्हीड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तसेच २० वाहने ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चोळखे, डॉ. प्रमोद कोंढावळे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय जंगाले, तलाठी अजय साळवे, प्रवीण थोरात, अशोक मोरे, आरोग्य सेवक पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Antigen test four interrupted at Shendi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here