नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी यांची नियुक्ती
Ahmednagar Upper Superintendent of Police: नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नागपूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नियुक्ती.
अहमदनगर: तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पोलीस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली आहे. रिक्त असलेल्या नगरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नागपूर येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नियुक्ती झाली आहे.
सोमवारी रात्री राज्य सरकारच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्याबाबत आदेश काढले. मागील महिन्यात तत्कालिन जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या जागी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली होती. अधीक्षक पाटील यांना मात्र पदस्थापना मिळाली नव्हती.
सोमवारी रात्री काढलेल्या आदेशामध्ये अधीक्षक पाटील यांची पोलीस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली आहे. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची सिंधुदूर्ग येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्यानंतर ती जागा रिक्त होती. त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे (नागरी हक्क संरक्षण, नागपूर) यांची नियुक्ती झाली आहे.
Web Title: Appointed as Upper Superintendent of Police of Ahmednagar
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App