संगमनेरात मटका अड्ड्यावर छापा ‘एलसीबी’कडून एकास अटक
Breaking News | Sangamner: एका कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकास अटक केली आहे.
संगमनेर: पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा बंद असल्याची चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे मात्र मटका जोमात सुरु असल्याचे वास्तव समोर आले आहे. नगर येथील ‘एलसीबी ‘च्या पोलिस पथकाने शनिवारी शहरातील दिल्ली नाका येथील एका कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून बशीर इसाक शेख (३०, रा. मोमीनपुरा, संगमनेर) या इसमास अटक केली आहे. त्याच्याकडून १२, ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरासह तालुक्यात मटका बंद असल्याचे सांगितले जाते, मात्र शहरात मटका काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी खुलेआम सुरूच आहे. एलसीबीने मटका अड्ड्यावर छापा टाकून शेख याला अटक केली. दरम्यान, चौकशीत त्याने मटका मालक स्वतः असल्याची कबुली पोलिसांना दिली, मुळ मालक मात्र या कारवाईतून बचावल्याची चर्चा सुरु आहे.
दिल्ली नाका येथे देशी दारु दुकानामागील बोळीमध्ये कल्याण नावाचा हार-जितीचा मटका जुगार लोकांना चिठ्ठ्यांवर आकडे घेणारा अड्डा सुरू असल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती.
स्थानिक गुन्हेचे पो. हवालदार सचिन अडबल, रविंद्र कर्डिले, मनोज गोसावी, ज्ञानेश्वर शिंदे, पो. नाईक विशाल गवांदे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई यशस्वी केली.
अवैध धंदे शहरासह तालुक्यात सुरुच !
मटका, जुगार अड्डे, गांजा तस्करी शहरासह तालुक्यात जोमात सुरू आहे. अवैध कत्तलखाने सर्रास सुरू आहेत. पो. नि. भगवान मथुरे सध्या रजेवर आहेत. नितीन चव्हाण यांनी येथील तात्पुरता पदभार स्वीकारला, मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची नागरिकांमधून उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
Web Title: arrested by ‘LCB’ in raid on Matka base in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study