अहमदनगर: महिलेवर अत्याचार करणाऱ्यास अटक
Ahmednagar News: स्वभावाचा गैरफायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी कल्याण रोड येथून अटक.
अहमदनगर: महिलेच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी कल्याण रोड येथून अटक केली. विक्रम संजय वाणे (वय ३०, रा. प्रशांत सोसायटी, कल्याण रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने घर दाखविण्याचा बहाणा करत महिलेला घरी नेले, लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. याबाबत कुणाला माहिती दिल्यास जीवे ठार मारीन, अशी धमकी आरोपीने महिला व तिच्या पतीला दिली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी वाणे हा त्याच्या कल्याण रोडवरील राहत्या घरी आला आहे, अशी गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपीला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन कोतवाली पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप थोरात, अमोला गाढे, कैलास शिरसाठ, याकूब सय्यद, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने केली.
Web Title: Arrested of woman abuser
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App