Home अकोले नारी शक्ती ही महान शक्ती असून नारी शिकली तर कुटुंब शिकते: आरती...

नारी शक्ती ही महान शक्ती असून नारी शिकली तर कुटुंब शिकते: आरती गांगुर्डे

Arti Gangurde Child Development Project Officer of Panchayat Samiti

अकोले प्रतिनिधी:  नारी शक्ती ही महान शक्ती असून नारी शिकली तर कुटुंब शिकते, त्यामुळे प्रत्येक महिलांनी बेटी बचाओ बेटी पढाओ याप्रमाणे काम करावे. मुलीचे महत्व हे पुरुषांपेक्षा कमी नाही, आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करीत असून कोणत्याही महिलेने स्वतः ला कमी लेखू नये. मुलीच्या जन्माचे स्वागत करा व घराजवळ परसबाग तयार करण्याचे आवाहन केले.तसेच किशोरी मुलीनी आहार चांगला घ्यावा व स्वच्छता नेहमी ठेवावी असे प्रतिपादन पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.आरती गांगुर्डे यांनी केले.

अंगणवाडी केंद्र,नवलेवाडी येथे 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती,एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाचा 45 वा वर्धापन दिन व बेटी बचाओ व बेटी पढाओ अभियान अंतर्गत कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

या वेळी अकोले गट क्रमांक 2 च्या पर्यवेक्षीका श्रीमती एम एस चव्हाण ,किशोरी मुली व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पाहुण्याच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले.

परखतपुर  येथील अंगनवाडी सेविका सौ.मंगल शेलार व शिवाजीनगर ( धुमाळवाडी) येथील अंगणवाडी सेविका सौ.जिजाबाई पापळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Arti Gangurde, Child Development Project Officer of Panchayat Samiti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here