अंक, रेषा, आकारातून अरविंद गाडेकर यांनी साकारली गणपती चित्रं !
Sangamner News: अंक, रेषा, अंक, आकारातून , ठिपक्यातून गणपतीचे विविध रूपे साकारली.
संगमनेर: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना संगमनेर येथील व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी दररोज अंक, रेषा, अंक, आकारातून , ठिपक्यातून गणपतीचे विविध रूपे साकारली. दहा दिवस त्यांनी चालविलेल्या उपक्रमास महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळाला. सोशलमीडियावर ही चित्र विशेष गाजली.
अनेक पालकांनी लहान मुलांना याचे अनुकरण करण्यासाठी चित्र रेखाटनाचा व्हिडीओ शेअर केला. आय लव्ह संगमनेर या ग्रुपने इंस्टाग्रामवर अरविंद गाडेकर यांचा अंक, रेषा, अंक, आकारातून , ठिपक्यातून गणपती साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला त्याला दहा हजाराच्या पुढे लाईक्स मिळाल्या. अनेक वृत्तवाहिन्यांनी सदरचा व्हिडीओ यु ट्यूब आणि आपल्या चॅनेलवर शेअर केला. त्यांच्या या उपक्रमास संगमनेरकरांनी दाद दिली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गाडेकर हे विद्यालयातून , कॉलेजमधून त्यांच्या कार्यक्रमातून व्यंगचित्रांची कार्यशाळा घेत असून विद्यार्थ्यांना व्यंगचित्रे काढण्यास शिकवितात.
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App