Home महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, नगर विकास मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, नगर विकास मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

arvind-kejriwal and Eknath Shinde Corona Positive

नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असल्याचे समोर आले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, यापूर्वी माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी क्वारंटाईन व्हावे आणि त्यांनी तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, ‘मी कोविड पॉझिटिव्ह आहे. सौम्य लक्षणे आहेत. स्वतः घरीच क्वारंटाईन झालो आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कृपया स्वत:ची काळजी घ्यावी, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेनचे नेते एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. . सुप्रिया सुळे, एकनाथ शिंदे, यशोमती ठाकूर यांच्यासह राज्यातल्या अनेक प्रमुख नेत्यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आता करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी.”

Web Title: arvind-kejriwal and Eknath Shinde Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here