Home अकोले अकोले: आश्रम शाळेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, अधीक्षकाला अटक

अकोले: आश्रम शाळेतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, अधीक्षकाला अटक

Akole Crime:  खडकी येथील अनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग (Molested)केल्याची घटना, अधीक्षकाला अटक.

Ashram school female employee molested, superintendent arrested

अकोले : तालुक्यातील खडकी येथील अनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेत जातिवाचक शिवीगाळ व मारहाण करत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. आरोपावरून अधीक्षक राजेश दगडू डुबे यांच्याविरुद्ध राजूर पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून  त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  अधीक्षक डुबे नेहमी वेगवेगळ्या कारणांवरून वाद घालून त्रास देतात. नुकतेच आश्रमशाळेत कामावर गेले तेव्हा स्वयंपाक कर्मचारी म्हणून अन्य दोन महिलादेखील हजर होत्या. आम्ही सर्वांनी स्वयंपाक बनविला. दुपारी सर्व मुले जेवणासाठी भोजनगृहात आले, त्या वेळी अधीक्षक डुबे, मुख्याध्यापक राजेंद्र भांगरे व काही शिक्षकही उपस्थित होते. आम्ही मुलांना जेवण वाढत असताना अधीक्षक डुबे माझ्याजवळ आले व शिव्या देऊन ‘कुठे चालली, येथे भाकरी वाढ’ म्हणाले. त्यांना व्यवस्थित बोलण्याची विनंती केली, त्यावर जातिवाचक शिवीगाळ करून त्यांनी विनयभंग केला. मी आरडाओरडा केला, तेव्हा केस ओढून, हात पिरगाळत मारहाण केली. मुख्याध्यापक, शिक्षकांनी डुबे यास बाजूला नेले.

राजूर पोलिसांनी अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून  डुबे यास अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे करीत आहेत.

Web Title: Ashram school female employee molested, superintendent arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here