भारत-पाक ४ वर्षांनंतर वनडेत भिडणार! भारताने टॉस जिंकला
ASIA CUP INDIA VS PAKISTAN LIVE SCORE: भारताने टॉस जिंकला असून बल्लेबाजी करण्याचा निर्णय.
भारत: संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार थोड्याच वेळात रंगणार आहे. या ‘हायव्होल्टेज सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे, भारतीय चाहते विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्या दमदार खेळाची अपेक्षा करत असून दुसरीकडे, पाकिस्तानच्या चाहत्यांना शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारीस रौफ या वेगवान त्रिकुटाकडून भेदक माऱ्याची आशा आहे.
फलंदाजांमध्ये भारताची मदार कर्णधार रोहित, कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. लोकेश राहुल पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नसल्याने यष्टिरक्षणाची जबाबदारी ईशान किशनवर येऊ शकते. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या या दोघांकडून भारताला मोठ्या अपेक्षा असतील. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनानंतर भारताचे आक्रमण धारदार झाले असून त्याच्या जोडीला मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज यांच्याकडूनही दमदार माऱ्याची आशा असेल. पाकिस्तानच्या फलंदाजीची मदार कर्णधार बाबर आझम, फखर झमान, इमामूल हक, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान यांच्यावर असेल, शादाब खानचा अष्टपैलू खेळ पाकिस्तानसाठी महत्त्वाचा ठरेल. गोलंदाजीमध्ये आफ्रिदी, नसीम आणि रौफ यांच्यावर मदार असली, तरी आफ्रिदीला नेपालविरुद्धच्या सलामी लढतीत दुखापत झाल्याने पाक संघात चिंतेचे वातावरण आहे. या तिघांनी यंदा एकत्रितपणे ४९ बळी घेतले आहेत.
दरम्यान भारत पाक रंगतदार सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार असून भारताने टॉस जिंकला असून बल्लेबाजी करण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा यांनी घेतला आहे.
Web Title: ASIA CUP INDIA VS PAKISTAN LIVE SCORE
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App