अकोले तालुक्याची कन्या अस्मिता ढगे हिने संपादन केली अमेरिकेतील न्यु. हेवन युनिव्हर्सिटीमधुन मास्टर ऑफ सायन्स पदवी
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक ची कन्या व सध्या पारगाव ता. आंबेगाव येथील अस्मिता चंद्रकांत ढगे (Asmita Dhage) हिने अमेरिकेतील न्यु. हेवन युनिव्हर्सिटी मधुन मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन केल्याबद्दल तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
भीमाशंकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांची अस्मिता ढगे कन्या असुन तिचे प्राथमिक शिक्षण पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयात झाले. इयत्ता दहावीला तीने 96 टक्के गुण मिळवुन पिंपरी येथील हिंदुस्थान अॅटीबोयोटीक विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला होता.
संगणक अभियांत्रिकीची पदवी संपादन केल्यानंतर तिला अमेरिकेतील न्यु. हेवन युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी अभ्याक्रमासाठी प्रवेश मिळाला. अस्मिता ढगे हिने डेटा सायन्स या विषयात मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली आहे.
अस्मिता ढगे हिने मिळवलेल्या यशाबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आदींनी आभिनंदन केले आहे.
Web Title: Asmita Dhage Master of Science degree from Haven University