Home नाशिक मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या गाडीवर हल्लेखोरांचा हल्ला

मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या गाडीवर हल्लेखोरांचा हल्ला

Breaking News | Nashik Crime: दोन वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न.

Assailants attacked Minister Dada Bhuse's son's car

मालेगाव : टेहरे चौफुलीजवळील पाटीदार भववनाजवळ मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या वाहनावर गुरुवारी (दि.19) पहाटे चारच्या सुमारास दोन वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकांने प्रसंगावधान राखत वाहन बाजूला घेतल्यामुळे भुसे थोडक्यात बचावले. याप्रकरणी चालक कृष्णा पाटील यांच्या फिर्यादीवरून छावणी ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

भुसे यांच्यासह चालक व अन्य एकजण गुरुवारी पहाटे कार (एम. एच 15 एफ.टी. 5377) मधून दाभाडीकडून मालेगावकडे येत असताना यांच्या वाहनावर पाठीमागून येणारी कार (एम.एच. 41 बीएच 0720) हिच्यातील संशयित तीन-चार तरुणांनी भुसे यांच्या वाहनाच्या बोनेटवर रॉडने वार करीत थांबविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुसऱ्या कार (एम.एच. 02 सीएच 4141) मधील संशयितांनी भुसे यांच्या कारला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान भुसे यांच्या वाहनचालकांने रॉडचा वार चुकवीत वाहन भरधाव घेतल्याने टेहेरे चौफुलीजवळील मालेगाव- सटाणा रस्त्यावरल पाटीदार भवनाजवळील दुभाजकावर धडकले. त्यातच त्यांच्या वाहनाचे पुढील टायर फुटल्याने अपघात झाला. भुसे यांच्या वाहनामागे असलेली दोन्ही वाहने ही दुभाजकांवर धडकली. यात भुसे यांचे वाहन चालक पाटील यांच्यासह अन्य एकजण तसेच हल्लेखारांच्या दोन्ही वाहनातील तीन ते चार जण जखमी झाले. यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी धाव घेतली. यावेळी संशियीत अंधाराचा फायदा घेत पसार झाले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Assailants attacked Minister Dada Bhuse’s son’s car

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here