आश्वीमध्ये दोन गटांत मारहाण, परस्परविरोधी गुन्हे दाखल
संगमनेर | Sangamner: घरासमोरच्या रस्त्यावर मुलांनी पाणी का फेकले याबाबत विचारणा केल्याच्या रागातून दोन गटांत भांडण होऊन हाणामारी झाल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. आश्वी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार दाखल केल्याने परस्परविरोधी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय मच्छिंद्र बर्डे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी १८ मे रोजी घरासमोरील रस्त्यावर मुलांनी पाणी का फेकले हे विचारले असता विजय बाळाजी पवार, शिवप्रसाद रमेश पवार, कृष्ण रमेश पवार, रमेश बाळाजी पवार यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे तक्रारीत म्हंटले आहे.
तर विजय बाळाजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रस्त्याने जात असताना दत्तात्रय मच्छिंद्र बर्डे, सदाशिव बर्डे, छाया सदाशिव बर्डे. संगीता दत्तात्रय बर्डे हे रस्त्याच्या कडेला उभे राहून शिवीगाळ करत होते. त्यांना शिवीगाळ करून नका असे म्हंटल्यावर राग येऊन मारहाण केली. असे तक्रारीत म्हंटले आहे. या दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Assault in two groups in Ashwi sangamner