परळीमध्ये हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण, व्हिडियो समोर आला
Beed Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
परळी: विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरु आहे. पण काही ठिकाणी राडा झाल्याचं समोर आलेय. परळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला.
परळी मतदारसंघात मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम चोपल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप होत आहे. कारण माराहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
आमचे सहकारी ॲड माधव आप्पा जाधव यांना परळी मतदारसंघातील बुथ बाहेर विरोधी पक्षाच्या गुंडानी बेदम मारहाण केली. अशा दहशत पसरवणार्या वृत्तीचा जाहीर निषेध.
परळी मतदारसंघात सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेत छेडछाड केलेले अनेक व्हिडीओ माध्यमातून प्रसारित होत आहेत. @BEEDPOLICE @ECISVEEP pic.twitter.com/fdSpJ1HlDX
— Bajrang Sonwane (@bajrangsonwane_) November 20, 2024
Web Title: Assembly Election leader of Sharad Pawar group was beaten up by the workers of Munde
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study