अहिल्यानगर: : मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार दुपारी दोन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार
Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणीस थोड्याच वेळात सुरुवात होणार.
अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून, मतमोजणीसाठी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी टपाली मतदानाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी एकूण उपलब्ध १ हजार ३८५ मनुष्यबळापैकी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणी कामासाठी नियुक्त असणार आहेत. या मनुष्यबळाची पहिली सरमिसळ १६ नोव्हेंबर, दुसरी २१ नोव्हेंबर रोजी झाली असून, तिसरी सरमिसळ आज पहाटे ५ वाजता करण्यात येणार आहे.
ईटीपीबीएस स्कॅनिंगसाठी अकोले, शिर्डी, कोपरगाव आणि श्रीरामपूर मतदारसंघात २ टेबल, संगमनेर, पारनेर अणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येकी ५, नेवासा, अहमदनगर शहर आणि कर्जत जामखेड मतदरसंघात प्रत्येकी ३, शेवगाव ४ आणि राहुरी मतदारसंघात ६ टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक आणि १ सहायकांची नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय मतमोजणीच्या वेळी प्रत्येक निवडणूक मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीला दोन सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीची आकडेवारी तपासण्यासाठी हे सूक्ष्म निरीक्षक सहकार्य करतील.
११ टेबलवर टपाली मतमोजणी टपाली मतदानासाठी अकोले मतदारसंघात ७ टेबल, संगमनेर आणि कर्जत जामखेड ९, शिर्डी आणि कोपरगाव ४, नेवासा आणि अहमदनगर शहर ६. श्रीरामपूर ५, शेवगाव १०, पारनेर १२, श्रीगोंदा मतदारसंघात ११ टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर १ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १ पर्यवेक्षक, २ सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असतील.
ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल
अकोले मतदारसंघातील ३०७ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्या होतील. संगमनेर २८८ आणि २१, शिर्डी २७१ आणि २०, कोपरगाव २७२ आणि २०, श्रीरामपूर ३११ आणि २३, नेवासा २७६ आणि २०, शेवगाव ३६८ आणि २७, राहुरी ३०८ आणि २२, पारनेर ३६६ आणि २७, अहमदनगर शहर २९७ आणि २२, श्रीगोंदा ३४५ आणि २५, तर कर्जत जामखेड मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रांसाठी मतमोजणीच्या २६ फेऱ्या होतील. प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात येणार असून, प्रत्येक टेबलसाठी त्यासाठी प्रत्येकी १ पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येईल.
Web Title: Assembly Election Result counting of votes will begin shortly. The picture will be clear by 2 pm
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study