Home पालघर शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, उमेदवारी न दिल्यामुळे ते भलतेच डिप्रेशनमध्ये,...

शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल, उमेदवारी न दिल्यामुळे ते भलतेच डिप्रेशनमध्ये, वारंवार जीवन संपवण्याचे विधान

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेचे विद्यमान आमदार व तिकीट कापलेले उमेदवार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते भलतेच डिप्रेशनमध्ये दिसून आले.

Assembly Election Shiv Sena MLA Srinivas Vanaga Not Reachable

पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार व तिकीट कापलेले उमेदवार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते भलतेच डिप्रेशनमध्ये दिसून आले. शिवसेनेने माझा घात केल्याची प्रतिक्रिया त्यांनी काल (सोमवार) संध्याकाळी प्रसार माध्यमांना दिली होती. या पत्रकार परिषदेनंतर ते घरातून बाहेर पडले व अजूनही ते घरात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरच्यांना चिंता लागून राहिली आहे. तर माझे पती डिप्रेशनमध्ये असून दोन दिवसांपासून जेवलेले नाहीत. ते वारंवार जीवन संपवण्याचे विधान करत आहेत, असे पत्रकार परिषदेत वनगा यांच्या पत्नी सुमन यांनी उघडपणे सांगितले होते. त्यानंतर श्रीनिवास अचानक गायब झाल्यामुळे सगळ्यांची धाकधूक वाढली आहे.

श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. काल संध्याकाळी श्रीनिवास वनगा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचे वक्तव्य केले होते. उमेदवारी कापल्याने दुःख सहन न झाल्यामुळे श्रीनिवास वनगा जोर जोरात हुंदके देताना आपली व्यथा सांगताना दिसत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर घरच्यांना येतो म्हणून सांगितले. मात्र आठ दहा तास झाले तरी ते घरी परतलेले नाहीत. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. विविध चर्चेला उत आला आहे. काहींच्या म्हणण्यानुसार ते घराबाहेर पडल्यानंतर एका काळ्या रंगाच्या कारमधून गेल्याचे सांगण्यात येते.

आमदारकीच्या स्पर्धेतूनच एकनाथ शिंदेंनी वगळल्यानं, श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये गेले आहेत. आमच्या प्रामाणिकपणाचं हेच का फळ? असा सवाल विचारणाऱ्या वनगांच्या मनात सध्या आत्महत्येचा विचार घोंघावू लागल्याचं त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगतिलं होतं. पण सध्या श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Assembly Election Shiv Sena MLA Srinivas Vanaga Not Reachable

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here