Home क्रीडा वंचित कोणाला पाठींबा देणार? निकालाच्या आधीच निर्णय

वंचित कोणाला पाठींबा देणार? निकालाच्या आधीच निर्णय

Assembly Election 2024: महायुती किंवा महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेस काही जागा कमी पडल्यास अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार.

Assembly Election Who will support the underprivileged

Prakash Ambedkar:  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारांचा नेमका कौल काय असणार, हे उद्या प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

महायुती किंवा महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेस काही जागा कमी पडल्यास अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे. “उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखे संख्याबळ मिळाल्यास आम्ही जो सरकार स्थापन करून शकेल, अशा आघाडीसोबत जाणं पसंत करू,” असं प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार, हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात, त्यावरच अवलंबून असणार आहे.

If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government. We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!

Web Title: Assembly Election Who will support the underprivileged

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here