लाच घेताना सहायक निरीक्षक लाललुचपत विभागाच्या जाळ्यात
सहाय्यक निरिक्षक १० हजारांची लाच (bribe) घेताना पुणे लाललुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
शिरूर: शिरूर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक निरिक्षक १० हजारांची लाच (Bribe) घेताना पुणे लाललुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
राजेंद्र दगडू गवारे असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे. गवारे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. दीर्घ सुट्टीनंतर ते हजर झाले होते. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षीय पुरुष तक्रारदार आणि त्यांचा मुलगा यांच्याविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. सदर गुन्ह्यांमध्ये अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी गवारे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज बुधवार (दि.२०) दुपारी पडताळणी दरम्यान तक्रारदाराने तडजोडीअंती दहा हजार रुपये गवारे याला देण्याचे कबुल केले. ही लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारताना पुणे येथील लाच लुचपत विभागाने सापळा रचून गवारे यास रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणिता सांगोलकर, पोलीस शिपाई प्रवीण तावरे आशिष डावकर, चालक पोलीस हवालदार काकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने केली आहे.
Web Title: Assistant Inspector Laluchpat in the net of taking bribe
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App