लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Breaking news | Bribe Case: पोलिस निरीक्षकास लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अटक केल्याची धककादायक घटना समोर आली आहे.
अकोला | बाळापूर : फसवणूकीच्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी सहा. पोलिस निरीक्षकास लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अटक केली आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. समाधान रेठे असे या लाचखोर पोलिस अधीकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह अन्य दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहीती अशी की, महीण्याभरापुर्वी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात आरोपीला सहकार्य करण्यासाठी न्यायालयाचा लिपीक व एका हॉटेल चालकाच्या माध्यमातून सहा. पोलीस निरीक्षक समाधान रेठे, यांनी दिड लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी नंतर ९० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ठरल्या प्रमाणे आज गुरुवारी न्यायालयाच्या परीसरातील एका हॉटेलवर सहा. पोलीस निरीक्षक समाधान रेठे, लिपीक कपले व हॉटेल चालक गोवर्धन कांबेकर तिघेजणांना नव्वद हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला एसीबीने अटक केली. आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Web Title: Assistant Police Inspector caught in ACB’s net while accepting bribe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study