Home औरंगाबाद खळबळजनक: सहाय्यक प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर बेशुद्ध पडेपर्यंत केला अत्याचार

खळबळजनक: सहाय्यक प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर बेशुद्ध पडेपर्यंत केला अत्याचार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime :  शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सहाय्यक प्राध्यापकानेच बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

assistant professor rape the student till she fell unconscious

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक शिक्षणक्षेत्रात खळबळ उडविणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सहाय्यक प्राध्यापकानेच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वसतिगृहात राहणे सुरक्षित नसल्याचे सांगत पीडित विद्यार्थिनीला घरी पेईंग गेस्ट म्हणून या प्राध्यापकाने नेले होते. मात्र घरी राहण्यासाठी नेऊन तिच्यावर सहाय्यक प्राध्यापकाने बलात्कार केला. विशेष म्हणजे या कृत्यात सहाय्यक प्राध्यापकाच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि त्याच्या पत्नीने संगनमताने माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केला आहे. अशोक गुरप्पा बंडगर असे आरोपी सहाय्यक प्राध्यापकाचे नाव असून, तो नाट्यशास्त्र विभागात नोकरीला आहे. तर या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात बंडगर पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  30 वर्षीय पीडिता बाहेरील जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात शिक्षणासाठी आली होती, आणि तिने शहरातील एका महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. यादरम्यान एका सर्व्हिस कोर्सनिमित्त तिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक अशोक गुरप्पा बंडगरसोबत ओळख झाली होती. तर विद्यापीठाबाहेरील महाविद्यालयाची विद्यार्थिनी असूनही बंडगरने मार्गदर्शन, सल्ला देण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक वाढवायला सुरुवात केलो. या काळात त्याने मी तयार करत असलेल्या चित्रपटात तुलाही काम करण्यासाठी संधी देतो, असे म्हणत आणखी जवळीक निर्माण केली.

काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीला बाहेर खोलीवर राहणे अशक्य झाल्याने तिने होस्टेलचा शोध सुरु केला. मात्र तिने निवडलेले होस्टेल सुरु झाले नसल्याने तिच्या राहण्याची अडचण होऊ लागली. त्याचदरम्यान तिची विद्यापीठ परिसरात बंडगरची भेट झाली आणि बोलता-बोलता तिने हा प्रकार त्याला सांगितला. यावेळी  बंडगरने तिला वडिलकीच्या नात्याने घरी चल, असे सांगून घरी नेले. त्याच्या पत्नीनेही पीडितेला, ‘होस्टेल सुरक्षित नसतात, तू आम्हाला मुलीसारखीच असून, पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आग्रह केला.

मुलीचा दर्जा दिल्याने मोठ्या विश्वासाने पीडिता पेईंग गेस्ट म्हणून बंडगर दाम्पत्याकडे राहायला लागली. मात्र पुढे काही दिवसांनी बंडगरने तिच्या जवळ जाण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याचे वागणे विचित्र वाटल्याने पीडितेने त्याला अनेकदा दूर राहण्यास सांगितले. दरम्यान पीडित मुलीवर घराची सर्व आर्थिक जबाबदारी देऊन, नंतर बंडगरने चोरीचा आळ घेऊन जुलैमध्ये तिच्यावर अत्याचार केला. पुढेही धमकावत वारंवार अत्याचार करत राहिला. हा सर्व प्रकार पीडितेने त्याच्या पत्नीला सांगितला. मात्र, ‘मला मुलगा नाही. तू आता माझ्या पतीसोबत लग्न कर. आम्हाला मुलगा हवा आहे,’ असे म्हणत बंडगरच्या पत्नीनेही तिला धमकावले. तसेच बंडगरची पत्नीदेखील पतीच्या कृत्याला समर्थन देत गेली. धक्कादायक म्हणजे जानेवारी 2023 मध्ये दोघे पती-पत्नीने त्यांच्या खोलीत नेऊन पीडित मुलीवर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान मुलीची प्रकृती बिघडल्याचे कळल्यानंतर पीडितेचे वडील आणि बहिणीने तिला गावाकडे नेले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि  विद्यापीठ प्रशासनाने पीडितेला बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: assistant professor rape the student till she fell unconscious

Sangamner Akole News Whats app Marketing

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here