Home नाशिक सहायक निबंधकांचा खासगी लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

सहायक निबंधकांचा खासगी लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

Nashik News: पतसंस्था पुनर्जीवीत करण्यासाठी मागितली लाच (Bribe).

Assistant Registrar's Private Auditor in ACB Bribe Case

नाशिक : सटाणा तालुक्यातील बिजोरसे येथील कै. द्रोपदबाई दादाजी काकडे, पतसंस्थेची नोंदणी रद्द न करता पतसंस्था पुनर्जीवित करून देण्यासाठी ओळखीचा फायदा घेऊन लाचेची मागणी करणाऱ्या सहकारी संस्था सहायक निबंधक यांचे खासगी लेखा परीक्षक चद्रकांत गोविंद अहिरे (वय ६१ ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.

त्यात संशयिताने लोकसेवक सहकारी संस्था सहायक निबंधक यांच्यासोबत असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तक्रारदारावर प्रभाव टाकीत नोंदणी रद्द न करण्याच्या आणि पुनरुज्जीवन करण्याचे भासवून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र तडजोडी अंती ४० हजार रुपये देण्याचे ठरले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार द्रोपदबाई दादाजी काकडे, पतसंस्थेची नोंदणी रद्द न करता पतसंस्था पुनर्जीवित करून देण्यासाठी संशयित चंद्रकांत गोविंद आहिरे (वय ६१ ), खाजगी लेखा परीक्षक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सटाणा जि. नाशिक यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क साधला असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ मार्च २०२३ रोजी या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. यावेळी हॅश व्हल्यू घेण्यात आली असून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी दिली.

Web Title: Assistant Registrar’s Private Auditor in ACB Bribe Case

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here