Home संगमनेर संगमनेरातील धक्कादायक घटना: पतसंस्थेने जमिनीवर बोजा चढवल्याने व्यवस्थापकांवर हल्ला

संगमनेरातील धक्कादायक घटना: पतसंस्थेने जमिनीवर बोजा चढवल्याने व्यवस्थापकांवर हल्ला

Breaking News | Sangamner Crime: २१ लाख ५० हजार रुपयांच्या कर्जापोटी कोणताही परतावा न केल्याने तारण मालमत्तेवर बोजा चढला. त्याचा राग मनात ठेवून चिकणीच्या बाप-बेट्याने बलराम सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक मतकर यांना बेदम मारहाण केल्याची घटना.

Attack on managers as credit institutions burdened the land

 संगमनेर:  जमिन तारण ठेवून पतसंस्थेकडून घेतलेल्या २१ लाख ५० हजार रुपयांच्या कर्जापोटी कोणताही परतावा न केल्याने तारण मालमत्तेवर बोजा चढला. त्याचा राग मनात ठेवून चिकणीच्या बाप-बेट्याने बलराम सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक पद्माकर मतकर यांना बेदम मारहाण केली. यावेळी पोराने पेपरवेट फेकून तर बापाने गचांडी धरून टेबलावरील काचेवर त्यांचे डोके आपटून त्यांना गंभीर जखमी केले. मदतीसाठी धावलेल्या महिला  कर्मचार्यांवरही दोघे बापलेक अर्वाच्च शिवीगाळ करीत धावून गेले. याप्रकरणी व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून संजय वर्षे व त्याचा मुलगा गौरव याच्यावर मारहाण 1 करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अकोले बायपास रस्त्यावरील बलराम सहकारी पतसंस्थेत घडली. संस्थेतील कर्मचारी नियमित कामकाज करीत असताना साडेतीनच्या दरम्यान संजय लक्ष्मण वर्षे व त्याचा मुलगा गौरव हे दोघेही कार्यालयात आले. त्यांनी थेट व्यवस्थापक पद्माकर मतकर यांच्या दालनात जात त्यांना अरेरावी करू लागले.

व्यवस्थापक मतकर यांनी चार वर्षांपूर्वी पतसंस्थेकडून जमिन तारण ठेवून २१ लाख ५० हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर त्यापोटी एकही हप्ता भरला नाही. त्यामुळे नियमानुसार ही प्रक्रिया झाल्याचेही त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्या बापलेकाने व्यवस्थापकावर हल्ला केला. टेबलवरील काचेचा पेपरवेट उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला, मात्र ते वेळीच खाली वाकल्याने त्याचा प्रहार पाठीला सहन करावा लागला. गचांडी पकडून मतकरांचे डोके टेबलवर आपटले. त्यामुळे टेबलवरील काच फूटून डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातून रक्तस्राव सुरू झाला. महिला कर्मचारी व्यवस्थापकाच्या मदतीला धावल्या. मात्र, त्यांनाही शिवीगाळ व दमदाटी करीत मागे लोटले. अन्य कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेवून उपचार केले. याप्रकरणी व्यवस्थापक पद्माकर मतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिकणी येथील संजय लक्ष्मण वर्षे व त्याचा मुलगा गौरव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attack on managers as credit institutions burdened the land

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here