Home Ahmednagar Live News मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

Ahmednagar Crime:  समाजसेवक व मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना.

attack on Marathi writer Heramb Kulkarni

अहमदनगर: समाजसेवक व मराठी लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी त्यावर हल्ला केला आहे. याबाबत हेरंब कुलकर्णी यांनी अहमदनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  ते आणि त्यांचे सहकारी गाडीवर जात असतानाच तीन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरती त्यांचा पाठलाग केला. ते गाडीच्या समोर आले, त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर गाडीवरील दोन व्यक्ती जवळ गेले आणि त्यांनी काहीच न बोलता मारहाण करण्यास सुरूवात केली.

अनोळखी व्यक्तींनी हातात रॉड घेऊन मारहाण केली. त्यानंतर काही वेळात ते तेथून निघून गेले. त्यानंतर हेरंब कुलकर्णी यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्याने हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर ४ टाके पडले आहेत.

दरम्यान याबाबत आधिक माहिती हेरंब कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिमा कुलकर्णी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.’

‘गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत. डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते थोडक्यात बचावले अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता. ते रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला.

Web Title: attack on Marathi writer Heramb Kulkarni

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here