Home अकोले कोतूळ येथे रस्त्याच्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला, गाव बंद; तणावपूर्ण वातावरण

कोतूळ येथे रस्त्याच्या वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला, गाव बंद; तणावपूर्ण वातावरण

Ahmednagar | Kotul News: पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस पाटील जखमी: गाव बंद; तणावपूर्ण वातावरण, रस्ते वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला (attack) झाल्याने गाव बंद ठेवून निषेध सभा घेण्यात आली.

attack on three people due to road dispute in Kotul

कोतूळ : कोतूळ येथील रस्ते वादातून कोतूळ येथील माजी सरपंच इंदिरा गोडे व कुटुंबीयांनी तीन ज्येष्ठ नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला, यात पोलिस उपनिरीक्षक बाजीराव गवारी व पोलिस पाटील सतीश देशमुख हेही जखमी झाले आहेत. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 

येथील रस्ता हा गोडे कुटुंबाच्या शेताशेजारून जात होता. मात्र, काही वर्षांपासून गोडे यांनी या रस्त्यावर शेती करून तो बंद केला. या विरोधात फिर्यादी सुरेश देशमुख व बाळासाहेब आरोटे, तसेच अन्य लोकांनी तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे रीतसर पुरावे दिले. तिन्ही ठिकाणी गोडे यांचे विरोधात निकाल गेला.

महिन्यांपूर्वी या रस्त्याचे कडेला पाहुण्यांची कार उभी होती. तिचा गोडे कुटुंबाच्या सदस्यांनी अक्षरशः दगडांनी चेंदामेंदा केला. या घटनेनंतर चार दिवसांत पोलिस व महसूल विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. चार सांगितले. दिवसांपूर्वी गोडे कुटुंबाने या रस्त्यावर घराचे काम सुरू केले. ही तक्रार सुरेश देशमुख व अन्य यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

पोलिसांनी तातडीने रविवारी पोलिस उपनिरीक्षक बाजीराव गवारी व पोलिस पाटील सतीश देशमुख यांना घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पंचनामा सुरू असताना अचानक इंदिरा गोडे, लक्ष्मण गोडे, भरत गोडे, जितेंद्र गोडे, विठ्ठल गोडे, नामदेव गोडे, सरला गोडे यांनी गज, खोरे, दगड व धारदार शस्त्राने हल्ला चढविला. यात सुरेश वामन देशमुख, देविदास वामन देशमुख, बाळासाहेब पांडुरंग आरोटे हे ज्येष्ठ नागरिक जबर जखमी झाले. पोलिस उपनिरीक्षक बाजीराव गवारी व पोलिस पाटील सतीश देशमुख हे जखमी झाले आहेत. गवारी यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले, तर इतर जखमी लोणी येथे उपचार घेत आहेत. घटनेनंतर काही तासांतच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण गाव बंद केले. गोडे कुटुंबावर आजपर्यंत अनेक हाणामारी आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे योग्य कारवाई व्हावी, म्हणून गाव बंद ठेवून निषेध सभा घेण्यात आली. सायंकाळी उशिरा अकोले पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Web Title: attack on three people due to road dispute in Kotul

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here