Home Ahmednagar Live News अहमदनगर ब्रेकिंग: बंदुकीच्या गोळ्या झाडून हल्ला, शेतावर बोलावून घेतले अन

अहमदनगर ब्रेकिंग: बंदुकीच्या गोळ्या झाडून हल्ला, शेतावर बोलावून घेतले अन

Ahmednagar | Karjat Firing: दोघांवर छऱ्याच्या बंदुकीच्या गोळ्या झाडून व लोखंडी गजाने वार करून हल्ला केल्याची धक्कादायक घटना.

Attacked by firing gun bullets, called on the farm

कर्जत: कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गावाच्या शिवारात चार जणांनी भांबोरा येथील दोघांवर छऱ्याच्या बंदुकीच्या गोळ्या झाडून व लोखंडी गजाने वार करून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या हल्ल्यात भांबोरा येथील योगेश सोमनाथ लोणकर व सचिन दिलीप कांबळे (वय ३७) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.

या प्रकरणी सागर वसंत हिरभगत, करण संदिप माने, कृष्णा उर्फ लाला सुखदेव हिरभगत, शंभु सुभाष हरीहर, (सर्व रा. भांबोरा, ता. कर्जत) यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  सागर वसंत हिरभगत याने सोमवारी रात्री योगेश लोणकर व सचिन कांबळे यांना तुम्हाला खर्च करतो, असे म्हणून वडार वस्ती येथील दादा शिंदे यांच्या शेताजवळील रस्त्यावर बोलावून घेतले.

त्यानंतर करण माने, कृष्णा हिरभगत व शंभु हरीहर यांनी योगेश लोणकर यांच्या पोटावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. तसेच सचिन कांबळे यांच्या डोक्यावर व तोंडावर लोखंडी गजाने वार करून गंभीर जखमी केले. जमिनीच्या कारणावरून हे वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attacked by firing gun bullets, called on the farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here