संगमनेरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
Breaking News | Sangamner Crime: तरुणाला बेदम मारहाण डोक्यात मारले दगड.
संगमनेर : तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यात दगड मारत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.१९) संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास अकोले नाका परिसरात घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
नीलेश सोमनाथ मंडलिक (वय ३६, रा. ढोलेवाडी) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिकेत मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर), साई सूर्यवंशी, अक्षय चव्हाण (दोघेही रा. अकोले नाका) आणि एक अनोळखी या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याविरोधात सचिन भाऊसाहेब नाईक (वय ३८, रा. कासारा दुमाला, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. जखमी मंडलिक हे फिर्यादी नाईक यांच्या मामाचा मुलगा आहेत.
मंडलिक यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून दगडाने डोक्यात मारण्यात करण्यात आली. त्यावेळी मंडलिक हे रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे, परिसरातील दुकानदारांकडे मदतीसाठी आरडाओरड करत होते. त्यावेळी मदतीसाठी धावून आलेल्या लोकांना ‘कोणी मध्ये पडला तर त्याला आम्ही मारून टाकू’ अशी धमकीही चौघांनी दिली.
Breaking News: Attempt to kill a young man in Sangamner