तरुणाच्या मानेवर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
राहता | Crime: तालुक्यातील लोहगाव शिवारात एका २५ वर्षीय तरुणाच्या मानेवर तलवारीने मार करण्याचा प्रयत्न करीत त्याच्या डोक्यात मद्याच्या रिकाम्या बाटल्या फोडून पल्सर मोटारसायकल अंगावर घालून तरुणास गंभीर जखमी करीत त्याच्याजवळील रोख रक्कम व मोबाईल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.
यबाबत लोणी पोलिसानी प्रवरानगर येथील चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लहूजी खैरे वय २५ रा. लोहगाव ता. राहता व त्याचे वडील लहूजी हिरामण खैरे असे दोघे जण प्रवरा नगर येथून तिसगाववाडी चौकातून लोहगाव येथे घरी जात असताना आरोपी यांनी त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकल आडवी लावून फिर्यादीचा रस्ता अडवून फिर्यादिकडील मोबाईल व १४ हजारांची रक्कम काढून घेत असताना अक्षय याने विरोध केला असता मनीष सारसर याने अक्षय यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्या हातातील तलवारीने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून पल्सर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी अक्षय खैरे याने दिलेल्या फिर्यादीवरून मनीष सारसर, अमर भोसले, संकेत भोसले, भैया भोसले या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे तर जखमी अक्षय यास लोणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Web Title: Attempt to kill the young man by stabbing crime Filed