Crime: मागील भांडणाच्या कारणातून एकाचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न
श्रीरामपूर | Crime: दुकानात घुसून मागील भांडणाचे कारण काढत मालकाचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. तसेच दुकानातील तीन नोकरानाही मारहाण केली. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील धनगर वस्ती येथे ख़ुशी इंटरप्रयाजेस नावाचे अब्दुलगणी यांच्या मालकीचे भंगाराचे दुकान आहे.
या दुकानात शहा यांचे जावई नासीर सय्यद हे काम करत असताना सुलतान शेरअली शेख हा बेकायदेशीर दुकानात घुसून मागील वादातून नासीर यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नसीर याने सुलतानाकडून स्वतःला सोडवून घेत असता त्या दुकानात काम करणारा पंकज गिल या नोकरास मारहाण केली. तसेच कामाला असणारे दाउद शेख, दत्तू अनारसे,इम्रान शेख, यांना देखील सुलतान याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दुकानातील भंगारचा माल बाहेर फेकून दिला. तसेच दुकानच्या बाहेर उभा असलेला आयशर टेम्पोवर दगडफेक करत टेम्पोचे नुकसान केले. याप्रकरणी सुलतान शेरअली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Attempt to strangle one due to previous quarrel crime filed