Home पुणे अंगावर पेट्रोल टाकून महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

अंगावर पेट्रोल टाकून महिला पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न

Breaking News | Pune Crime: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई सुरू असताना एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाने पेट्रोल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न.

attempt was made to burn a female police officer by pouring petrol on her body

पुणे : वाहतूक शाखेकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई सुरू असताना एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह हवालदारावर एकाने पेट्रोल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. विश्रामबाग पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर आणि पोलिस हवालदार समीर सावंत हे दोघे जखमी झाले आहेत. संजय फकीरबा साळवे (वय ३२, सध्या रा. पिंपरी-चिंचवड, मूळ राहणार. पिंपळगाव शेला, पो. जवखेडा बु., जि. जालना) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

कारवाई दरम्यान संजय साळवे दुचाकीवरून जात होता. पोलिसांनी त्याला अडवले. यावेळी आरोपीने पोलिसांच्या हातातील मशिन हिसकावून घेतली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर यांनी त्याला पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर आरोपी काहीतरी कारण सांगून बाहेर गेला आणि थोड्या वेळाने हातात पेट्रोलची बाटली घेऊन आला. हवालदार समीर सावंत आणि एपीआय शैलजा जानकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. तो लाइटरने त्यांना पेटवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला इतर पोलिसांनी रोखले.

Web Title: attempt was made to burn a female police officer by pouring petrol on her body

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here