Home अहमदनगर अहमदनगर: डोक्यात रॉड घालून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर: डोक्यात रॉड घालून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagar News: जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा संशय; गुन्हा (Crime) दाखल.

attempt was made to kill a young man by putting a rod on his head Crime Filed

अहमदनगर: कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जात असल्याच्या संशयावरून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुफियान मुस्तफा सौदागर ( वय ३४, रा. खलीलपुरा, ता. जुन्नर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे ( नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सहा सहा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर भांबरे (रा. जखणगाव ता. नगर) व आकाश फुले (रा. नेप्ती ता. नगर) तसेच अनोळखी चौघांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. २ नोव्हेंबर रोजी ११ वाजता कायनेटीक चौकात ही घटना घडली आहे. सौदागर हे त्यांच्या टेम्पोमधून घोडेगाव ता. नेवासा) येथील बाजारात गाई विक्रीसाठी घेऊन जात असताना सागर भांबरे, आकाश फुले व इतरांनी तीन दुचाकीवरून येत सौदागर यांचा टेम्पो कायनेटीक चौकात थांबविला. ते सौदागर यांना म्हणाले, ‘तु गाडीतून खाली उतर, त्यास

सौदागर यांनी नकार दिल्याने भांबरे व इतरांनी, ‘तू गाई तस्करी करत आहे, तुला आम्ही जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणून गाडीतून खाली ओढून आकाश फुले याने जिवे मारण्याच्या उद्देशाने सौदागर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर गंभीर दुखापत केली. इतरांनीही सौदागर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

Web Title: attempt was made to kill a young man by putting a rod on his head Crime Filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here