संगमनेर: कुऱ्हाडीने डोक्यावर घाव आणि मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न अखेर…
Breaking News | Sangamner: चुलत भावांमधील वादातील शेतजमीन नांगरल्याचा राग येऊन रात्री कुऱ्हाडीने डोक्यावर घाव आणि मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.
संगमनेर: चुलत भावांमधील वादातील शेतजमीन नांगरल्याचा राग येऊन रात्री कुऱ्हाडीने डोक्यावर घाव आणि मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर, अन्य पाच आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
सुरेंद्र देवराम तांगडकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर, प्रवीण सुरेंद्र तांगडकर, सुरेंद्र तांगडकर, कल्पना संकेत मच्छिद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिद्र देवराम तांगडकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शनिवारी या खटल्याचा निकाल जाहीर केला.
संगमनेर तालुक्यातील तांगडी (आंबीखालसा) येथील या खटल्याकडे संगमनेर तालुक्याच्या पठार भागाचे लक्ष लागले होते. सरकार पक्षाच्या वतीने या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील मच्छिद्र गवते यांनी काम पाहिले, तर फिर्यादीच्या वतीने अॅड. अश्विनी घुले व अॅड. प्रकाश काळे यांनी साहाय्य केले,
या संदर्भात सागर पौपट तांगडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार तांगडी (आंबीखालसा) येथील सुरेंद्र देवराम तांगडकर व त्यांचा भाऊ राजेंद्र देवराम तांगडकर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होते. त्यांच्यातील वादातील शेतजमीन पोपट नानाभाऊ तांगडकर यांनी नांगरून दिली होती. पोपट तांगडकर यांना रात्री वडिलांचा फोन आला. त्यामुळे पोपट चुलतभावाबरोबर ते शेतात गेले. तेव्हा त्यांना वेगात येणाऱ्या दुचाकीवर गावातील काही लोक दिसले होते. फिर्यादी शेतात गेला असता, बडील बेशुद्ध पडलेले व त्यांच्या डोक्यातून रक्त येत असलेले दिसून आले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. फिर्यादीकडील ट्रॅक्टर ड्रायव्हर शांताराम दुधवडे यांनी दिलेल्या माहितीनंतर सुरेंद्र देवराम तांगडकर, प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिंद्र देवराम तांगडकर (सर्व रा. तांगडी, आंबीखालसा, संगमनेर) यांनी पोपट तांगडकर यांना जीव घेण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याची फिर्याद दिली होती. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी तपास करत न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते.
Web Title: Attempted murder by ax injury and beating
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study