लॉजवर प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न, प्रियकराने गळफास घेत केली आत्महत्या, दरवाजा वाजवत होते….
Breaking News | Pimpri Crime: प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना, या घटनेने खळबळ उडाली आहे.
पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न करून प्रियकराने गळफास घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यानंतर घटनास्थळी पिंपरी पोलीस दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि. १०) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील खराळवाडीत असलेल्या हॉटेल राज प्लाझा या ठिकाणी ही घटना घडली आहे. नितेश नरेश मिनेकर (वय- ३४ रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर, २८ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेली माहिती अशी की, , गुरुवारी दुपारी साडेचार सुमारास संबंधित तरुण व तरुणी लॉज राज प्लाझा येथे आले होते. त्यांनी या लॉजवर एक रूम बुक केली होती. लॉजवर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. त्यांचे हे भांडण ऐकून हॉटेल व्यवस्थापकाने ११२ नंबर वर फोन करत पोलिसांना बोलावले. पोलीस हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी त्या दोघांच्या रूमचा दरवाजा ठोठावला.
रूममधून नितेशने कपडे घालत असून दरवाजा उघडतो, असे उत्तर दिले. परंतु, त्यानंतर बराच वेळ झाला, तरी दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा, २८ वर्षीय तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर नितेशने गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या आणि आत्महत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचा अंदाज पिंपरी पोलिसांकडून वर्तवला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Web Title: Attempted murder of girlfriend at lodge, boyfriend committed suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study