संतापजनक घटना: मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार
Pune Crime: एका मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मामीला अटक (Arrested).
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना उघडकीसआली आहे. एका मामीनेच आपल्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मामीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तब्बल दोन वर्षांनंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये भाची आपल्या मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी ९ वर्षांच्या चिमुकलीला विवस्त्र करायची आणि मारहाण करायची. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील करत होती. तिचे विवस्त्र फोटो काढत होती.
कोरोना काळात चिमुकलीच्या आईने तिला आपल्या भावाच्या घरी ठेवले होते. भाऊ हवाई दलात नोकरी करत असून तो आपल्या कुटुंबासह हवाई दल वसाहतीत राहतो. कोरोना काळानंतर मुलगी पुन्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिने घडलेली घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मामी चिमुकलीला सतत मारहाण करायची. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत मामी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Aunt sexually assaults niece
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App