Home Crime News पोटच्या मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार; जाब विचारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात घातली फरशी

पोटच्या मुलीवर बापाकडून लैंगिक अत्याचार; जाब विचारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात घातली फरशी

Aurangabad Crime

Aurangabad Crime : स्वतःच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच अत्याचार केल्याची संताप आणणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. याहून संतापजनक बाब म्हणजे या दुष्कृत्याबाबत जाब विचारणाऱ्या पत्नीला सुद्धा या नराधमाने अमानुषपणे मारहाण केली. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात राहणारा नराधम बाप मागील पाच महिन्यांपासून आपल्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पुन्हा एकदा या नराधमाने आपल्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत आईला किंवा भावाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील त्याने आपल्या मुलीला दिली. या धमकीने मुलगी प्रचंड घाबरली.

हा सर्व प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्या पतीला याबाबत जाब विचारला. मात्र या नराधमाने यावरून आपल्या पत्नीलाही अमानुषपणे मारहाण करत तिच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारला. ज्यात फर्यादी महिला जखमी झाली. त्यानंतर जखमी महिलेने पतीच्या कारनाम्यांना वैतागून वाळूज पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. महिलेच्या फिर्यादीनंतर विकृत पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपिला अटक केली.

Web Title : Aurangabad Crime : Daughter sexually abused by father; The floor laid on the head of the questioning wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here