Home महाराष्ट्र 7 वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरुन आईच्या हातातून सुटलं; मृत्यूने हळहळ

7 वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरुन आईच्या हातातून सुटलं; मृत्यूने हळहळ

Breaking News | Palghar Accident:  21 व्या मजल्यावरून खाली पडल्याने 7 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू. (Death)

Baby born after 7 years, escapes from mother's arms from 21st floor Death

पालघर : अनेकदा उंच इमारतीवरुन पडल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता विरारमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून 21 व्या मजल्यावरून खाली पडल्याने 7 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.  ही घटना बुधवार 23 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजण्याच्या सुमारास विरार पश्चिमेकडील जॉय विला कॉम्प्लेक्समधील  पिनॅकल सोसायटीत घडली आहे.

विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीमधील 21 व्या मजल्यावर राहत होते. त्यांचा सात महिन्यांचा मुलगा व्रिशांक उर्फ वेद याला झोप येत नव्हती, म्हणून पूजा सेदानी त्याला कुशीत घेऊन मास्टर बेडरुममध्ये फिरत होत्या. बेडरुममध्ये हवा यावी म्हणून त्यांनी बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडी ठेवली होती. मात्र, अचानक फरशी ओलसर असल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्या थेट बाल्कनीच्या दिशेने पडल्या. या झटक्यात त्यांच्या कुशीत असलेला व्रिशांक हा बाल्कनीतून थेट खाली पडला. या दुर्घटनेनंतर तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Breaking News: Baby born after 7 years, escapes from mother’s arms from 21st floor Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here