Ahmednagar News: दोन कुटुंबांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील ६७ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.
राहाता: तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे दोन कुटुंबांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील ६७ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज कोपरगाव येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पिंपरी निर्मळ येथील दोन मागासवर्गीय कुटूंबांवर गेल्या ६ डिसेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी तब्बल ६७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींवर अनुसुचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांसह इतर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामिन अर्जावर न्यायालयात दोन दिवस सुनावणी झाली.
आरोपीतर्फे अॅड. जयंत जोशी यांनी बाजू मांडली, तर फिर्यादीच्या वतीने अॅड. बी. एन. गंगावणे यांनी, तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अशोक वहाडणे यांनी बाजू मांडली, तसेच या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांनी सुनावणीच्या वेळी हजर राहून आरोपींनी कट रचून कशा प्रकारे हा गुन्हा केला, तसेच त्यांना पोलीस कोठडी मिळणे कसे आवश्यक आहे, आदी मुद्दे मांडले व जामीन अर्जास विरोध दर्शवीला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. करत आहे.
Web Title: Bail rejected for 67 accused
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App