Home संगमनेर बाळासाहेब थोरात जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले, सरकार म्हणजे तुम्ही काय……

बाळासाहेब थोरात जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले, सरकार म्हणजे तुम्ही काय……

Breaking News | Balasaheb Thorat: तुम्ही जिल्हाधिकारी आहात. पिण्याचे पाणी पुरवण्याची तुमची जबाबदारी.

Balasaheb Thorat lashed out at the district collector, the government means 

संगमनेर: जांबूत बुद्रुक (ता. संगमनेर) येथे शुक्रवारी (ता. ८) जाऊन त्यांनी उपसरपंच सुभाष डोंगरे यांना लिंबूपाणी देऊन आठव्या दिवशी त्यांचे उपोषण सोडले. डोंगरे यांनी उपोषण सोडले यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार उपोषणस्थळी नसल्याने थोरात यांनी इतर महसूल अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले.

सरकार म्हणजे तुम्ही काय समजता माणस मेली, तरी चालेल ही भावना तुमची आहे? असे म्हणत माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात हे जिल्हाधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले होते.

नांदूर-खंदरमाळ, जांबुत खुर्द, जांबुत बुद्रुक, साकूर, मांडवे, बिरेवाडी, शिंदोडी या गावांसह पारनेर तालुक्यातील पोखरी, देसवडे, मांडवे खुर्द, टेकडवाडी या नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांसह जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीत आवर्तन सोडा या मागणीसाठी जांबूत बुद्रुक डोंगरे यांनी गावात उपोषण सुरू केले होते. मात्र, यावर तोडगा न निघाल्याने नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, जोपर्यंत पिंपळगाव खांड धरणातून मुळा नदीला आवर्तन येत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही या निर्णयावर डोंगरे ठाम होते. मात्र, आज थोरात यांनी उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासंदर्भात थोरातांपुढे व्यथाही मांडल्या.

नेमकं काय म्हणाले थोरात

सरकार म्हणजे तुम्ही काय समजता? माझ्याकरिता नाही पण ज्यांनी आठ दिवसांपासून आमरण उपोषण केले आहे. त्यांच्यासाठी तरी या ठिकाणी येणे गरजेचे होते. माणसं मेली तरी चालेल ही भावना तुमची आहे का? असे म्हणत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तुम्ही जिल्हाधिकारी आहात. पिण्याचे पाणी पुरवण्याची तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास काही अडचण नाही. अडचणी सुटल्या पाहिजे बाकी काही सांगू नका.

Web Title: Balasaheb Thorat lashed out at the district collector, the government means 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here