Home संगमनेर दिशा सालियन प्रकरणात बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

दिशा सालियन प्रकरणात बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

Balasaheb Thorat on Disha Salian Case: दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला.

Balasaheb Thorat's big statement on Disha Salian case

 संगमनेर: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केली आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करतानाच या प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, सूरज पांचोली, एकता कपूर, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती, इम्तियाज खत्री, शोविक चक्रवर्ती, आदित्यचे सुरक्षा रक्षक हिमांशू शिक्रे या सर्वांचे 3 ते 20 ऑगस्ट 2020 चे कॉल रेकॉर्ड चेक करा, टॉवर लोकेशनही तपासून घ्यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आता यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संगमनेर तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 58 वा गळीत हंगामाची सांगता आज करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत विचारले असता बाळासाहेब थोरात म्हणाले की,  2014 पासून देशात आरोपांचं, दबावाचं राजकारण सुरू आहे. या सगळ्या गोष्टीमागे राजकारण असण्याची शक्यता आहे. हा दबावतंत्राचा एक भाग असू शकतो, हे मला माझ्या अनुभवावरून वाटते, असे त्यांनी म्हटले.

Web Title: Balasaheb Thorat’s big statement on Disha Salian case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here