Home Maharashtra News वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी Bandatatya Karadkar पोलिसांच्या ताब्यात

वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी Bandatatya Karadkar पोलिसांच्या ताब्यात

Bandatatya Karadkar

Bandatatya Karadkar : वाईनच्या निर्णयावरुन महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल बंडातात्या कराडकर हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. बंडातात्या कराडकर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पोलीस फलटणच्या पिंपरद येथील मठावर दाखल झाले होते. यानंतर बंडातात्याना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी बंडातात्यांसोबत मठावर चर्चा केली. दारु आणि महिला नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्या केल्याप्रकरणी पोलीसांनी बंडातात्यांना त्यांच्या मठातून ताब्यात घेतले आहे. साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती संघटनेचे ‘दंडवत आणि दंडूका’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील सर्वच नेत्यांची मुले ही दारु पितात असे वादग्रस्त वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी यावेळी मेले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता.

बेकायदेशीरपणे आंदोलन केल्याने तसेच वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी राष्ट्रवादी कडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. या वक्तव्या बाबत बंडातात्या यांनी आपला माफीनामा दिला होता. मात्र सध्या त्यांच्यावर सातारा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Bandatatya Karadkar in police custody for making controversial statement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here