Home Ahmednagar Live News अहमदनगर: बाप्पांचा थाट वेगळाच; चक्क झाडावर गणपतीची प्रतिष्ठापना

अहमदनगर: बाप्पांचा थाट वेगळाच; चक्क झाडावर गणपतीची प्रतिष्ठापना

Ahmednagar News: गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच, गणपती बाप्पा चक्क झाडावर बसवले.

Bappa's attitude is different from Lord Ganesha on a tree

अहमदनगर: प्रत्येक मंडळ गणेशोत्सवामध्ये वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करीत असतो. असाच एक आगळावेगळा गणेशोत्सव अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात या ठिकाणी साजरा केला जात आहे. तुम्हाला नवल वाटेल गणपती बाप्पा चक्क झाडावर बसवले आहेत.

विसापूर-कोरेगाव ता. श्रीगोंदा येथील अवलिया युवकाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्याचा प्रयत्न केलाच. परंतु त्याही पुढे जाऊन त्याने चक्क शेतात झाडावर गणेश प्रतिष्ठापना केली आहे. कोरेगाव येथील सागर थोरात आणि राजन थोरात या युवकांनी मागील वर्षीही अशाच प्रकारे बाभळीच्या झाडावर गणेश प्रतिष्ठापना करून अनोख्या पद्धतीने घरगुती मंडळाचा गणेशोत्सव साजरा केला होता. यावेळी त्यांनी याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा देखाव्यात समाविष्ट केला आहे. या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी लहान शेततळे तयार करण्यात आले असून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

दररोजच्या बातम्या  मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज

सर्व व्यवस्था पर्यावरण पूरक स्वरूपात करण्यात आली आहे. सागर थोरात कोरेगावमधील साबळे मळ्यात राहत असून त्याने छावा ग्रुपच्या युवकांचे सहकार्याने शेतात हा उपक्रम राबविला आहे. या उत्सवात त्याला घरातील सर्व सदस्यांनी मदत केली आहे. नगर-दौंड महामार्गावरील चिखली येथून कोरेगाव चार किलो मीटर अंतरावर आहे. अशा प्रकारचा गणेश उत्सवातील हा आगळावेगळा उपक्रम म्हणजे गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच आहे. गणेश भक्तांचे पाऊले गावाकडून आपोआप सागर थोरात यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी वळत आहेत. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Web Title: Bappa’s attitude is different from Lord Ganesha on a tree

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here