Home क्रीडा बीसीसीआय लवकरच सुरू करणार Women IPL

बीसीसीआय लवकरच सुरू करणार Women IPL

Women IPL

Women IPL : काही वर्षांपासून भारतात महिला टी-२० चॅलेंज ट्रॉफी खेळवली जाते. मात्र अनेक आजी-माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या महिला बिग बॅश प्रमाणे महिलांसाठी देखील आयपीएल स्पर्धा भरविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आता याबाबत मोठे अपडेट दिले आहे. यावर्षी मे महिन्यात पुन्हा एकदा महिला चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. मात्र लवकरच महिला आयपीएलचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे संकेत गांगुली यांनी दिले आहेत.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की, ‘महिला भारतीय संघ आगामी काळात कसोटी सामने खेळणार आहे. आणि लवकरच आम्ही महिला आयपीएलचे मोठ्या स्तरावर आयोजन करू. महिला खेळाडूंची संख्या वाढेल, तेव्हा आयपीएल स्पर्धा नक्कीच होतील. सध्या महिला चॅलेंजर्स ट्रॉफीचे आयोजन आयपीएल प्लेऑफ दरम्यान केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या अगोदरही गांगुली यांनी महिला आयपीएल सुरू करण्याबाबत आशावाद व्यक्त केला होता. ‘महिला आयपीएल खेळवणे आमच्या मनात आहे. आम्ही त्यावर विचार देखील करत आहोत. लवकरच महिलांसाठीची आयपीएल सुरू होईल असे त्यांनी सांगितले. ‘महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेला चाहत्यांनी भरपूर पाठिंबा दिला होता आणि ही एक चांगली गोष्ट आहे. महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग व्हावी असे सर्वांच्या मनात आहे, पण सध्या तीन-चार संघांना सोबत घेऊन ही स्पर्धा सुरू करता येणे शक्य नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले आहे.

Web Title : BCCI intends to start women IPL competition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here