संगमनेर: मागील भांडणाच्या कारणातून फायटरने मारहाण, तिघांवर गुन्हा
Sangamner Crime: मागील भांडणाच्या कारणावरून फायटरने मारहाण.
संगमनेर: ‘तू आमच्या बातम्या पोलिसांना देतो का, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करीत दोन चुलत भावांना मारहाण करण्यात आली. मागील भांडणाच्या कारणावरून फायटरने मारहाण करण्यात आली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संगमनेर शहरातील परदेशपुरा आणि नालकर मळा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस अदखलपात्र गुन्हा तसेच विविध कलमान्वये गुन्हा, असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. ठाण्यात
स्वप्नील कवडे (रा. गोल्डन सिटी, संगमनेर ) आणि स्वप्नील कवडे याचे दोन मित्र (नाव, पत्ता माहीत नाही) अशा एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. संगमनेर खुर्द येथे राखपसरे कुटुंबीय राहतात. यातील संतोष अभिमन्यू राखपसरे (वय ३५) हे मजुरी करून त्यांचा कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी (दि. ०१) रात्री ९ च्या सुमारास जेवण करून ते परदेशपुरा येथे गेले असता, कवडे हा तेथे आला. ‘तू आमच्या बातम्या पोलिसांना देतो का. असे म्हणत त्याने राखपसरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. ०२) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचे चुलतभाऊ जगन श्रावण राखपसरे हे कामाहून आल्यानंतर परदेशपुरा येथे दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिऊन घरी जात असताना नालकर मळा येथे कवडे आणि त्याच्या दोन मित्रांनी जगन राखपसरे यांचे चुलतभाऊ संतोष राखपसरे यांच्या सोबत झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून जगन राखपसरे यांना शिवीगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यांना फायटरने मारहाणीत केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Web Title: Beaten by fighter due to previous quarrel, Crime against three
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App