Home संगमनेर संगमनेर: तरुणाला मारहाण; पाच ते सहा जणांवर गुन्हा

संगमनेर: तरुणाला मारहाण; पाच ते सहा जणांवर गुन्हा

Breaking News | Sangamner Crime: बसस्थानकात आजीची औषधे आणण्यासाठी आलेल्या तरुणाला सुरुवातीला तिघांनी आणि नंतर पाच ते सहा अनोळखी तरुणांनी धक्काबुक्की व दमबाजी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण.

Beating a young man Crime against five to six persons

संगमनेर: शहरातील बसस्थानकात आजीची औषधे आणण्यासाठी आलेल्या तरुणाला सुरुवातीला तिघांनी आणि नंतर पाच ते सहा अनोळखी तरुणांनी धक्काबुक्की व दमबाजी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सदर घटना शनिवार दि. २३ मार्च रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत तिघांसह अनोळखी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की हुजेब अय्याज शेख (वय २५) हा तरुण आजीची औषधे आणण्यासाठी बसस्थानकातील एका मेडिकलमध्ये आला होता. त्यावेळी एका ओळखीच्या मित्रासोबत बोलत असताना दोन ते तीन तरुण रागात बघून परत आले आणि म्हणाले आमच्याकडे रागाने का बघतो ? तेव्हा मी तुमच्याकडे बघत नव्हतो. याचा राग आल्याने पाच ते सहा तरुणांनी गराडा घालून दमबाजी केली. धक्काबुक्की करत असताना हुजेब तेथून पळून जात असताना कुणीतरी वीट फेकून मारली, परंतु ती त्याला लागली नाही. त्यानंतर अनोळखी पाच ते सहाजण आणि अक्षय धुमाळ, गोल्या ठाकूर व अमोल मिश्रा यांनी मारहाण केली. तर अक्षयने टणक वस्तूने खांद्यावर मारून हुजेबला जखमी केले. यावेळी त्या तरुणांनी शिवीगाळ करून घोषणाबाजीही केली.

याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुक्याचे देवीदास ढुमणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी हुजेब शेख याने दिलेल्या तक्रारीवरून वरील तिघांसह अनोळखी पाच ते सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहे. दरम्यान, याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांना मिळताच त्यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

Web Title: Beating a young man Crime against five to six persons

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here