संगमनेर: जुन्या कौटुंबिक वादातून मारहाण
Breaking News | Sangamner Crime: जुन्या कौटुंबिक वादातून तिघांनी आई-वडिलांसह मुलाला मारहाण केल्याची घटना.
संगमनेर : जुन्या कौटुंबिक वादातून तिघांनी आई-वडिलांसह मुलाला मारहाण केल्याची घटना संगमनेरातील नांदूरखंदरमाळ येथे शुक्रवारी (दि. २६) सकाळी घडली.
याप्रकरणी संकेत भीमाजी करंजेकर (वय ३१, रा. नांदूरखंदरमाळ, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन संभाजी भागवत, शुभम नितीन भागवत, जगदीश संभाजी भागवत (सर्व रा. नांदूरखंदरमाळ, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संकेत करंजेकर हे आई-वडिलांसह नांदूरखंदरमाळ येथे राहतात. नितीन भागवत व त्यांचे जुने कौटुंबिक वाद आहेत. करंजेकर हे गावचे वेशीवर मित्रांसोबत बसलेले असताना नितीन भागवत याने तेथे जाऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे करंजेकर हे शेताकडे निघून गेले. साडेदहा वाजताच्या सुमारास वरील तिघे जण करंजेकर यांच्या शेताकडे गेले. त्यांनी करंजेकर यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी करंजेकर यांचे आई- वडील सोडविण्यास मध्ये आले असता त्यांनाही मारहाण करत धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे.
Web Title: beating from an old family dispute crime Filed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study