Home Maharashtra News भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला धडक, दोन ठार

भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला धडक, दोन ठार

Beed Accident Swift Desire hits acacia tree

बीड | Accident: परळीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीची, बाभळीच्या झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात (Accident)  दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी तेलगाव येथे घडली आहे. हा अपघात एवढा भिषण व ह्रदयद्रावक होता की, मयत व जखमींना तेलगाव येथील नागरिकांनी व पोलीस कर्मचारी यांनी जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले.

या अपघातात सचिन भोसले, युसूफ शेख हे दोघे ठार झाले आहेत. तर अमोल वाघमारे हा युवक गंभीर जखमी झाला आहे.

नांदेड  जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण डिझायर गाडीने भोकर येथून बीडला जात असताना, तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या बाभळीच्या झाडाला स्विफ्ट डिझायर गाडीची (क्रमांक MH-13 CK 0441) जोरात धडक बसल्याने हा अपघात घडला.

Web Title: Beed Accident Swift Desire hits acacia tree

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here