Breaking News | Sangamner: मदिनानगर येथे छापा टाकून २ लाख ४० हजार रुपये किमतीचे बाराशे किलो गोमांस जप्त.
संगमनेर: संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि.२) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मदिनानगर येथे छापा टाकून २ लाख ४० हजार रुपये किमतीचे बाराशे किलो गोमांस जप्त केले आहे. यावरून संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाणे सुरु असल्याचे समोर आले आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, मदिनानगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती की शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, विवेक जाधव, सागर जाधव यांना कारवाईचे आदेश दिले. या पथकाने छापा टाकून २ लाख ४० हजार रुपयांचे बाराशे किलो गोमांस जप्त केले. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी तनवीर इकबाल शेख हा घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित कुन्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तनवीर शेख याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर ७८/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ४२९, २६९ सह महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (क), ९ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. कॉ. वाकळे हे करत आहे.
Web Title: Beef worth two and a half lakh seized in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study